गोपाळ जोशी यांना अटक
बेंगळुरू:
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाल जोशी याला बेंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्रातून अटक केली आहे. गोपाळ जोशी यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आमिष दाखवून २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्यांचा भाऊ गोपाळ जोशी यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण
जेडीएसचे माजी आमदार देवानंद यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी गोपाल जोशी आणि इतर दोन लोकांविरुद्ध बेंगळुरूमधील बसवेश्वरा नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने म्हटले होते की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गोपाळ जोशी यांनी आपल्याकडून २ कोटी रुपये घेतले होते आणि निवडणुकीत पतीला तिकीट देऊ असे सांगितले होते. मात्र तिकीट दिले नाही. ती पैसे परत मागण्यासाठी गेली असता त्याने तिला शिवीगाळही केली. पोलिसांनी फसवणूक आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
लोकसभा निवडणुकीत तिकीट हेराफेरीच्या आरोपावरून सुनीता चव्हाण नावाच्या महिलेने कर्नाटकातील हुबळी येथील बसवेश्वरा नगर पोलीस ठाण्यात गोपाल जोशी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, गोपाल जोशी यांनी तिला सांगितले होते की, माझ्या भावाचे केंद्र सरकारमध्ये चांगले पद आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी कायदेशीर प्रक्रियेद्वारे अधिकृतपणे स्वतःला भावापासून वेगळे केले होते.