♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडल्या च्या निषेधार्थ मंठा येथे कडकडीत बंद.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडल्या च्या निषेधार्थ मंठा येथे कडकडीत बंद.

मंठा: नेत्रा न्युज-२४
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने चिरडल्यामुळे आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या निषेधार्थ सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.या बंदला
मंठा शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला. महाविकास आघाडीचा मोर्चा मंठा टी पॉईंट येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप
करण्यात आला.
लखीमपूर येथील घटनेत अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्यात आली नाही. युपीमध्ये भाजपचे सरकार आहे व केंद्रातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळेच मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केला. केंद्रीयगृहराज्यमंत्री यांच्या मुलावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा जिल्हाप्रमुख यांनी दिला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव बोराडे यांनी केंद्र सरकारच्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.या वेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किसनराव मोरे यांनी आपल्या भाषणात बोलता म्हणाले की,केंद सरकार शेतकऱ्याच्या जिवावर उठले असून शेतकऱ्यांचे सर्व प्रकारात जाणीव पूर्वक नुकसान करत आहे अश्या शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला . या वेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किसनराव मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार,नीलकंठ वायाल,प.स. सदस्य बाबा राठोड,अँड ज्ञानेश्वर जाधव,नगरसेवक अचीतराव बोराडे, प्रदीप बोराडे, आरून वाघमारे, शिराजखा पठाण, कायुमभाई कुरेशी, शबाब कुरेशी,शेख इजाजुदिन,बालासाहेब घणवट,दिगंबर बोराडे, प्रकाश घुले,बाळासाहेब वाजोळकर,अविनाश खरात,यांच्यासह बहू संख्येने शेतकऱ्याची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पप्पु दायमा यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close