♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ठाकरे सरकारने ६.८०० रुपये मदत जाहीर करुन शेतकऱ्यांचा अपमान केला,म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन होणार…
प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष

जालना: नेत्रा न्युज-२४
जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्या न्याय हक्कासाठी अन्याया विरोधात आवाज उठून,मनसे अध्यक्ष:श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी मा.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना पत्र देऊन मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून ५० हजार रुपये मदत देण्यात यावी म्हणून अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती,परंतु आघाडी सरकार ६ हाजार ८०० रुपये देऊन शेतकऱ्यांची निराशा केल्यामुळे,अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने ५० हजार रुपये देऊन ओला दुष्काळ जाहिर करावा व इतर प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त संभाजीनगर-औरंगाबाद कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे,करण यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडून शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले, मराठवाड्यातील खरीप हंगामात पेरणी वेळेवर झाली होती सुरुवातीला कमी अधिक पाऊस होता परंतु खरीप पिके सोयाबीन कापूस या दोन प्रमुख पिकावर दुष्परिणाम झाला सतत पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा मध्ये सरदा निर्माण झाल्यामुळे शेंगातील दाने भरले नाही जे भरले ते काळे पडले,शेतामध्ये सतत पाणी असल्यामुळे कपाशीची वाढ झाली नाही ज्या ठिकाणी कपाशीची वाढ झाली त्या ठिकाणी कपसाल फळे सडून गेले,हे दोन पिके प्रमुख्याने मराठवाड्यातील शेतकरी घेतात, यावर्षी जालना जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु आधीच पाऊस असल्यामुळे ते ही हातातून गेले म्हणून मनसे नेते मा.दिलीप (बापु) धोत्रे,मा.संतोष भाऊ नागरगोजे,मा.प्रकाशजी महाजन,श्री.अशोकजी तावरे,श्री. सुमितजी खांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त धरणे आंदोलन होणार आहे…
तरी मनसे पदाधिकाऱ्यांसोबच तरुण शेतकऱ्यांनी या आंदोलनात स्वतःहून सहभाग घ्यावा करण आंदोलन जनहितार्थ आहे, आणि आपल्यासाठी जर कोणी कम करीत असेल तर आपण त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे एक तर आपल्या पाठिंब्यामुळे त्यांचं मनोधर्य वाढतं असते आणि परत ते लोकांसाठी स्वतःला झोकून देऊन ते काम करतात त्यांच्या संघर्षामुळे आपल्याला न्याय मिळत असतो म्हणून आपण शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे,११ऑक्टोंबर २०२१ रोजी वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत,ठिकाण:-विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संभाजीनगर-औरंगाबाद
जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांनी व तरुण शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन सामील व्हावे असे ही मनसे जिल्हाध्यक्ष सोळंके आव्हान केली आहे….

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close