♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने अतिक्रमण हटवावे ; नागरिकांची मागणी.

मुख्य रस्त्यावरील हात गाडी चालकान मुळे  मंठा शहराचे विद्रुपीकरण 

नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने अतिक्रमण हटवावे ; नागरिकांची मागणी.

अतिक्रमणाचा भस्मासुर वाढत चाल्यामुळे वाहन चालकांची उडतेय तारांबळ.

मंठा: नेत्रा न्युज २४
        मुख्य रस्त्यावरील हात गाडी चालकान मुळे मंठा शहराचे विद्रुपीकरण होत आहे.अतिक्रमणाचा भस्मासुर वाढत आल्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.असे असताना नगरपंचायत व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने येथील नागरिकात असंतोष वाढत आहे.
मंठा शहराचा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून मंठा टी पॉईंट, मार्केट कमिटीकडे जाणारा रस्ता, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उस्वद रोड पर्यंत हातगाडीवाले यांनी मुख्य रस्ताच व्यापून टाकल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून हातगाडीवाल्यांना बाजार मैदानात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे, रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे मुख्य रस्त्यावरील व्यापारी सुद्धा त्रस्त झाले आहेत, या हातगाड्यांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असून अनेक वेळा वाहतूक खोळंबली जात आहे, या हातगाडी चालकांना हात गाडी बाजूला घे असे सांगितल्यास ते अरेरावीची भाषा करतात अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगरपंचायत व पोलीस प्रशासन संयुक्तपणे कारवाई का करत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. मुख्य रस्त्यावरील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. या अतिमहत्त्वाच्या प्रश्‍नाकडे नगरपंचायत मुद्दामहुन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. हातगाडीवाल्यांचा सुद्धा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न आहेच मात्र त्यांना मुख्य रस्त्यावर व्यवसाय न करू देता बाजार मैदानात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून मुख्य रस्त्याचा श्वास मोकळा करावा व शहराचे झालेले विद्रुपीकरण दूर करून मुख्य रस्ता सुशोभित करावा अशी मागणी होत आहे.
======== ================
मंठा पोलीस स्टेशन समोरून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी वाहनधारकांनी पार्किंगचे स्वरूप आणले आहे, या रस्त्यावर काही ठिकाणी बांधकाम साहित्य सुद्धा पडलेले दिसून येते, ग्रामीण रुग्णालयातून रेफर पेशंटला जालना किंवा औरंगाबाद येथे नेण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो.तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातगाडे व सायकाळ दूध विकणारे हे रोडवर अतिक्रमणाची स्पर्धा करत आहेत. तसेच शुक्रवारी बाजारच्या दिवशी रस्त्यावरच आठवडी बाजार भरत असल्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, पोलिस स्टेशन समोर चारचाकी वाहन धारकांना वाहने उभी करण्यास सक्त मनाई करावी अशी मागणी होत आहे.
============================
मुख्य रस्त्यावर वरील वाढत्या अतिक्रमण बाबत नगरपंचायत मुख्यधिकरी सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे.येथील देवी मंदिराकडे जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे.तसेच आता शाळा देखील सरू झाल्या असल्याने मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही या साठी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई केली जाईल.आणि एका अठवड्यात दोन वेळा कारवाही झालेल्या अतिक्रमण धारकचे वाहन जप्त करून पुढील २० दिवसा पर्यंत सोडले जाणार नाही.याची नोंद घ्यावी.असे म्हटले आहे.
———————————————————
मंठा मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तीन ट्राफिकचे कर्मचारी मागवण्यात आले असून रस्त्यावर ट्राफिक होणाऱ्या ठिकाणी बॅरिकेट देखील लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close