♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हक्क आणि अधिकाराबरोबर मुलींनी कतृव्य विसरू नये- न्या. पूजा एन कोकाटे.

  • हक्क आणि अधिकाराबरोबर मुलींनी कतृव्य विसरू नये- न्या. पूजा एन कोकाटे

शंभू महादेव विद्या मंदिर शाळेत कायदेविषयक शिबीर

वाटूर फाटा:नेत्रा न्युज-२४
हक्क आणि अधिकारा बरोबर मुलींनी कतृव्य विसरू नये असं प्रतिपादन परतूर येथील दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कोकाटे यांनी केलंय.देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत.. त्यामुळं देशासह संपूर्ण महाराष्ट्रात ०२ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय.त्याच अनुशंगानं आज वाटूर फाटा येथील शंभू महादेव विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांकरिता कायदे विषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं..सर्व सामान्य नागरिकांपर्यंत कायद्याचं ज्ञान पोहचावं,एखाद्या नागरिकाला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी,हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून या महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत या कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं.. यामध्ये नागरिकांनी तालुका विधी प्राधिकरणा मार्फत मोफत विधी साहाय्य घेण्याचं आवाहनही यावेळी कोकाटे यांनी केलं आहे.. या कार्यक्रमात ॲड.भगवान जाधव,वि सहा सरकारी अभियोक्ता यांनी आरोपींचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले तसेच ॲड.एन.एन.आढे यांनी महिलांचे अधिकार याविषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्थाविक अँड.जगन्नाथ बागल अध्यक्ष वकील संघ परतूर यांनी केले या कार्यक्रमास ज्येष्ट विधिज्ञ जेड.एन.कादरी,मुद्दसीर देशमुख,पोलीस उपनिरीक्षक अंभोरेंसह शाळेचे मुख्याध्यापक काकडे सर यांची उपस्थिती होती.दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रंगनाथ खेडेकर सर तर मुद्दसीर देशमुख यांनी आभार प्रदर्शन केलंय.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close