♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

येथील धोकादायक गढी उतरवून घेण्याची मागणी

येथील धोकादायक गढी उतरवून घेण्याची मागणी .

मंठा: नेत्रा न्युज 24
देवगाव खवणे ता.मंठा येथील गढी व बुरुज सातत्याने ढासळत असल्यामुळे जीवितहानीची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे, ही अत्यंत धोकादायक असलेली गढी व बुरुज तात्काळ उतरवून जीवितहानी टाळण्याची मागणी सरपंच डॉ.संदीप मोरे व ग्रामस्थांनी तहसीलदार मंठा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गढीच्या खाली काही कुटुंब राहतात गढीची माती सातत्याने ढासळत आहे, काही दिवसापूर्वी गढी ढासळून काही वाहनांचे नुकसान झाले होते. या संदर्भात सरपंच डॉ. संदीप मोरे व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाला कळविले सुद्धा होते, त्या अनुषंगाने तलाठी मंगेश देशमुख यांनी पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला मात्र तालुका प्रशासनाने याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही, गढी कोसळून जीवितहानी होण्याची भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर डॉ.संतोष मोरे, नारायण मोरे, कैलास मोरे, शिवाजी मोरे, रामराव मोरे, मदन मोरे, गंगा मोरे, विलास मोरे, दत्‍तराव मस्के, विष्णू मोरे, संपत मोरे, विष्णू मोरे, गजानन मोरे, सतीश मोरे, श्‍याम मोरे, नारायण मोरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close