♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कोविड नियमांचे पालन करून ज्ञानमंदिर उघडणार- प्रशांत रोहनकर

कोविड नियमांचे पालन करून ज्ञानमंदिर उघडणार- प्रशांत रोहनकर

मंठा: नेत्रा न्युज 24
तालुका कोरोणा मुक्त होत आहे.आपण एक स्थित्यंतरातून जात आहोत.आपण परिपत्रकानुसार दि.०४ऑक्टोंबर पासून इयत्ता पाचवी च्या पुढील वर्गाच्या शाळा सुरू होत आहेत.तरी आपण कोरोणा मुक्त आहोत. तरी नियमांचे पालन करूनच मंठा तालुक्यातील ज्ञान मंदिरे उघडल्या जातील असे आव्हान मंठा तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांनी केले.
साधन केंद्र येथील केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,विषय साधन व्यक्ती यांच्या बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते. माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या बैठक दिनांक ३० रोजी जालना येथे झाली होती.त्या अनुषंगाने शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर मंठा तालुक्यातील केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,साधन व्यक्ती यांची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीमध्ये गटविकास अधिकारी प्रशांत रोहणकर,गटशिक्षण अधिकारी सतीश शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे उपस्थितांना मार्गदर्शनानुसार गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबत नियमावलीच्या संदर्भाने मार्गदर्शन केले शालेय स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा,अनिश्चित करणे,शिक्षकाची कोरोणा बाबतची लसीकरण, बैठक ही व्यवस्था वर्गांमधील एका बाकावर एक विद्यार्थी,शारीरिक आंतर नियमाची अंमलबजावणी करण्याकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे,शाळेतील कार्यक्रमावर निर्बंध पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता या मुद्द्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले तर शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबत गट विकास अधिकारी प्रशांत रोहनकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी सतीश शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष गिर्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गट समन्वयक के.जी.राठोड यांनी केले.

मंठा ग्रामीण         शाळा             विध्यार्थी
१३३               १२,९२५
मंठा शहर            ०९                  ४,०७५

मंठा तालुक्यातील दिनांक ०४ ऑक्टोंबर पासून इयत्ता पाचवीपासून या शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबतच्या नियमावलीच्या आधीन राहून निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे कोविड-१९ बाबतची लसीकरण बैठक व्यवस्था वर्गामधील एका बाकावर एक विद्यार्थी शारीरिक आंतर नियमाची अंमलबजावणी करूनच शाळा सुरू करण्यात येणार आहे.

के.जी.राठोड,गटसमन्वयक
गट साधन केंद्र,मंठा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close