♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

यवतमाळ जिल्हात २४ तासात एक पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त

 

यवतमाळ : नेत्रा न्युज 24
दि.०२ऑक्टोबर :
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण नऊ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण ५८०जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित ५७९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७२८८६ आहे,तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७१०९०आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८७ मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील एका महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष ४६ हजार ६०७ चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष ७२ हजार ६३९ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ९.७८असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी ०.१७आहे तर मृत्यूदर २.४५आहे.
जीएमसी,डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६६ बेड उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ११ डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि १६खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या २१७४आहे. यापैकी ८ बेड रुग्णांसाठी उपयोगात असून २१६६बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ७८७ बेडपैकी ८बेड रुग्णांसाठी उपयोगात असून ७७९बेड शिल्लक,११ डीसीएचसीमध्ये एकूण ७५५ बेडपैकी पुर्ण ७५५बेड शिल्लक आणि १६खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण ६३२ बेडपैकी पुर्ण ६३२ बेड शिल्लक आहेत.
संकलन
अनिल ठाकुर,पुसद.ईश्वरसिंह,सेंगर.जय राठोड,यवतमाळ

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close