♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नवोदय परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अशोका पब्लिक स्कूलमध्ये संपन्न.

नवोदय परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अशोका पब्लिक स्कूलमध्ये संपन्न.
मंठा:नेत्रा न्युज 24
         मंठा येथील अशोका पब्लिक स्कूल मंठा व छत्रपती संभाजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हेलस संयुक्त विद्यमाने नवोदय परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अशोका पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मंठा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयच देशमुख साहेब, लोकमतचे पत्रकार राजेभाऊ भुतेकर हे होते.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय चव्हाण होते.
यावेळी अशोका पब्लिक स्कूल मंठा चे विद्यार्थी यश संजय भवर, आनंदी संदीप हाके, शिवश्री समाधान काळे हे तीन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. हार, श्रीफळ, परीक्षेचापॅड, पुस्तक व शाळेची ट्रॉफी देऊन या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले.
              शाळा व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन,विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत व सातत्य ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले. सालाबादाप्रमाणे दरवर्षी अशोका पब्लिक स्कूल चे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय साठी पात्र होत असतात या वर्षी तब्बल जवळपास तीन विद्यार्थी पात्र असल्याचा अभिमान सर्व शिक्षक,शाळा व संस्थेला आहे. असेच प्रयत्न पुढे ठेवल्यास हे विद्यार्थी शाळेचा पालकांचे नाव मोठे करतील असा विश्वास याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रल्हादराव हाके,संजय भवर,समाधान काळे, संदीप हाके,संतोष चव्हाण, पो.कॉ.प्रशांत काळे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर बरसाले यांनी केले तर आभार छत्रपती संभाजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक इरशाद खान पठाण यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close