♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विविध मागणीसाठी ग्राम रोजगार सेवकाचे तहसीलदारांना निवेदन

 

मंठा : नेत्रा न्युज 24
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामरोजगार सेवकाची संख्या २८ हजार १४४ असून राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.राज्यात सन २००६ पासून ग्राम रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून सहा टक्के त्यांना सेवेत मानधनावर कार्यरत असून,मागील पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना सेवेत कायम करावे अन्यथा लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र ग्रामपंचायत रोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात समितीच्यावतीने म्हटले आहे की,प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनल च्या माध्यमातून नवीन सरपंच व सदस्य यांची निवड होते.मात्र राज्यातील बहुतेक ग्रामपंचायत मध्ये सडबुध्दीने ग्राम रोजगार सेवकावर खोटे आरोप करून त्यांना कामावरून कमी केली जाते.ग्राम रोजगार सेवकावर जाणून-बुजून अन्याय केला जातो.ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांना मानसिक त्रास होत असून,त्यांच्या कुटुंबाची उपासमारी होत आहे. राज्यातील सर्व रोजगार सेवकांना ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करून त्यांच्यावर होणा-या अन्याय दूर करावा.अन्यथा येत्या २आक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र ग्रामपंचायत रोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे या निवेदनावर अध्यक्ष विक्रम राठोड, उपाध्यक्ष कैलास राठोड,लक्ष्मण चव्हाण,विकास राठोड, कैलास राठोड,विठ्ठल गिराम,उत्तम खवणे,शत्रुघन घनवट, किशोर साळवे,रवी कुमार राठोड,नवनाथ शिंदे,केशव केंद्रे राजेश चव्हाण,विलास राठोड, ज्ञानदेव जाधव,विठ्ठल राठोड,भारत खराबे,बाळासाहेब काकडे,संतोष देशमुख, रामकिसन ईकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close