♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करा – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे मागणी

… तर मंत्री वडेट्टीवार यांचा चांदीचा रथ देऊन सत्कार करू – माजी मंत्री आमदार लोणीकर यांचे आव्हान

जालना:नेत्रा न्युज 24
संपूर्ण मराठवाड्यात पावसानेेेे थैमान माजले असून  सोयाबीन,कापूस,उडीद,मूग,तूर,ऊस,द्राक्ष,केळी या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे मागील एक महिन्यापासून संतत धार पाऊस सोयाबीन सारख्या पिकाला जागेवरच कोंब फुटले आहेत.अगोदरच दुबार पेरणी मुळे शेतकरी संकटात सापडलेला होता,त्यात हातातोंडाशी आलेला घास गेला असल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणी सापडला आहे.शेतकऱ्यावर अस्मानी संकटात बरोबर सुलतानी संकट देखील असून यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या चा पर्याय निवडू अशी गंभीर परिस्थिती निर्माण जिल्हासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झाली आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार व फळपीक साठी हेक्टरी १ लाख रु ची मदत मागितली होती, आता मदत देने त्यांच्या हाती आहे,
संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली

महाराष्ट्र सरकार आणि पिक विमा कंपन्यांचे साटेलोटे असून प्रशासनामार्फत केले जाणारे पंचनामे मी आज येणार आहे धरले जात नाहीत स्वतः शेतकऱ्यांनी सर्व बाबी ऑनलाइन करणे फोटो अपलोड करणे यासारख्या अनेक बाबी ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग करू शकत नाही परिणामी प्रत्यक्षात मतदान झालेले असताना पिक विमा मिळण्यासाठी संबंधित शेतकरी पात्र ठरणार नाहीत त्यामुळे प्रशासनामार्फत तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी केलेले पंचनामे पिक विमा मिळण्यासाठी ग्राह्य धरले जावेत तुमच्या बालिका ऑनलाईन करणे आवश्यक आहे त्या सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करावेत व शेतकऱ्यांना या जाचातून मोकळं करावं अशी मागणी देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली

सरकार स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांना दमडीची मदत केली नाही सरकारने केलेली नाही शेतकऱ्यांच्या गोंधळ दर हेक्टरी २५ हजार ५० हजार, ०१ लाख रुपये पर्यंतच्या मदतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या परंतु या सर्व घोषणा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशा प्रकारच्या घोषणा आहेत यातील एकही ही घोषणा सरकारने पूर्ण केली नाही सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मुळावर आले असून आपापले वसुलीचे टार्गेट पूर्ण करणे एवढे एकमेव काम सरकारकडे उरले आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडतो आहे
=================
जालना जिल्ह्यातील सरासरी व अपेक्षित पाऊस

तालुका – सरासरी पाऊस – अपेक्षित

 जालना – १०८२.४० मिली – ६३२.९९ मिली

मंठा – १०६६.७० मिली – ६६७.२९ मिली
परतूर – १०४९.५० मिली – ६४०.४० मिली
घनसावंगी – ११५०.३० मिली – ६२८.५१ मिली
अंबड – १२०१.०० मिली – ५८४.२९ मिली
बदनापूर – ९५१.८० मिली – ५८६.६२ मिली
भोकरदन – ८६४.५० मिली – ५३८.८५ मिली
जाफराबाद – ८२१.७० मिली – ५७१.६७ मिली
================
सरकारने सद्यस्थितीत ई पीक पाहणी त्यांची सत्तेची केली असून ती ई पीक अँपची अट सक्तीची करू नका, सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकरी या सर्व बाबी ऑनलाइन करू शकत नाहीत त्यामुळे अँपवर माहिती अपलोड करण्याचं काम प्रशासनाने (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक) करावे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन आणि प्रशासनाने घेणे गरजेचे आहे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्यास सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील शेतकऱ्यांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे गंभीर पाहून पोचल्यास त्याला पूर्णतः शासन जबाबदार राहील असेही लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली, सरासरी ९०० ते १००० मिली पाऊस पडला असून २० ते २५ लाख हेक्टर पेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी शिरलं, अनेक गावांमध्ये पाणी शिरले. हेलस येथे योगेश रामप्रसाद खराबे हा तरुण वीज पडून मृत्युमुखी पडला, अतिवृष्टी व कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नाही म्हणून येनोरा ता.परतुर येथील सदाशिव शिवाजीराव भूंबर वाहेगाव सोपारा येथील दत्ता मच्छिंद्र काटे या तरुणाने आत्महत्या झाली, श्रीष्टी ता. परतूर येथे मोटर सायकल व एक बस नदीत वाहून गेली, संपूर्ण मराठवाडाभर अशीच परिस्थिती आहे एवढं सगळं असताना अद्याप शासनाला ओला दुष्काळ जाहीर करावा असे वाटत नाही हे दुर्दैव असल्याचे देखील लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले
==================
मंत्री वडेट्टीवार यांना आव्हान, पीकविमा कंपनीच्या मालकाला अटक करा तुमचा जाहीर सत्कार करतो-लोणीकर
पिक विमा बाबत सरकारची दुटप्पी भूमिका असून, महाराष्ट्र सरकारचे अंधारात कंपनीशी साटेलोटे आहे जनतेसमोर बोलताना मात्र राज्यातील मंत्री बोलघेवडेपणा करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पीक विमा कंपनीच्या मालकाला अटक करण्याची घोषणा केली आहे… प्रत्यक्षात चुकीचा करार करायचा, जनतेची दिशाभूल करायची असा या सरकार चा गोरख धंदा बनला आहे, कंपनीशी साटेलोटे करून, दलाली खाऊन, शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकून गोड बोलून हे सरकार शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप यावेळी लोणीकर यांनी केला. सरकारने केलेल्या कराराप्रमाणे कंपनी पिकविम्यांची मालक अन सरकार गुलाम झाले आहे, तो शेतकरी विरोधी करार तात्काळ रद्द करावा व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे जर  पिक विमा कंपनीच्या मालकाला अटक केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चांदीच्या रथ देऊन मंत्री वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हानच लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिलं
==================
सरकार व आरोग्यमंत्री यांनी जिल्ह्याजिल्ह्यात वाझे तयार केलेत…!

  • न्यासा कम्युनिकेशन या ६ राज्यात बंदी असणाऱ्या भ्रष्ट कंपनीला कंत्राट देऊन सरकार व आरोग्यमंत्री यांनी जिल्ह्याजिल्ह्यात “वाझे” तयार केले आहेत ५ लाखपासून २५ लाखापर्यंत नोकरीसाठी पैसे घेतले जात आहेत. याची सी आय डी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण केली असून सरकारने तरुणांच्या आयुष्याचे वाटोळे केले आहे. आता पुन्हा एकाची दिवशी दोन्ही परीक्षा ठेवत विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे जणांची नाही तर किमान मनाची लाज असेल तर सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करेल पण या सरकार कडून तसं काही ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षाच विद्यार्थ्यांना आणि जनतेला नाही अशा शब्दात लोणीकर यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला…

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close