♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंठा येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

 

मंठा : (नेत्रा न्युज 24)
येथील गुरु अबॅकस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या चॅम्पियन स्पर्धेचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस वितरण करण्यात आले.
मंठा येथील गुरू अबॅकस च्या वतीने अकॅडमीच्या सभागृहात दि.२६ सप्टें रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक सचिन सोनटक्के तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय बोराडे , ब्राईटस्टार इंग्लिश स्कुलचे प्राचार्य उमेश राठोड , हिंद केसरी विद्यालयाचे मुख्याध्यापक फकिरा निकाळजे यांची आवर्जुन उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेचे शिक्षक सत्यदिप इंगळे यांनी सुमधूर स्तवन सादर केले.तर कु.प्रिया सरकटे, कु.सई मोरे व कु.हर्षदा खारवणे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.समृद्धी गायकवाड हिने केले.अकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी ‘नॅशनल लेव्हल स्पर्धा २०२१’ या स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या गुणवंतांमध्ये कु.समृद्धी महेश देशपांडे हिने फर्स्ट लेव्हल मध्ये प्रथम क्रमांक पटकावून विशेष कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वैभव हातकडके, हर्षदा खारवणे, सई मोरे व वैष्णवी टकले या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेव्हल स्पर्धेत भरीव कामगिरी केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात रेकॉर्ड चेंजर स्पर्धेची कु.समृद्धी महेश देशपांडे ही मानकरी ठरली.चॅम्पियन स्पर्धेचा मानकरी ठरलेला चॅम्पियन तुषार ज्ञानेश्वर बोराडे या विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या वतीने करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते तुषार बोराडे या विद्यार्थ्यास दुचाकी सायकल, मेडल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.बक्षीस वितरणानंतर प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रेणुका गोरे व वैभव हातकडके यांनी केले; तर कु.वैष्णवी टकले हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्यायशस्वीरितेसाठी मिलींद वेव्हल सर, सत्यजित इंगळे सर, सुमित उगले सर व गुरू अबॅकस अकॅडमीचे संचालक गणेश गुंड सर यांनी परिश्रम घेतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close