♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बस गाळात फसल्याने लोणार-मंठा हायवे वर ट्रॅफिक जाम

 

वाहनांच्या लांबच लांब रांगा

मंठा : (नेत्रान्युज 24)
मंठा-लोणार हायवे वर पिपरखेडा ते
ढोकसाळ घाटाचे काम अपुरे राहिलेले आहे.आजची वस्तुस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे संपुर्ण शेतातील पाणी रस्त्यावर वाहून आलेने पाण्याबरोबर शेतातील मातीचा गाळ रस्त्यावर वाहून आला.संपुर्ण रस्त्यावर चिखल झालेला होता .
रस्त्यावरील चिखल तथा अतिवृष्टीमुळे पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असलेने आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी पंढरपूर ते मेहकर एसटी मंडळाची बस पिंपरखेडा घाटावर एकेरी मार्ग असल्यामुळे तसेच शेतातील माती वाहून आल्यामुळे चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले.यामुळे बस रोडच्या कडेला खाली जाऊन चिखलात रुतून बसली. त्यामुळे बस काढण्यास एक ते दोन तास वेळ लागला.संपुर्ण वहातूक दोन तास खोळंबली. सदरील घटना ही ढोकसाळ व पिंपरखेडा घाटामध्ये घडली जवळ जवळ दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा उभ्या राहिल्या होत्या.यामुळे बस मधील प्रवाशी तथा इतर वाहनावरून आलेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असले चे चित्र पहायला मिळाले आहे .

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close