♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्यातील नायगाव हे १००% लसीकरण घेणारे गाव

 

गावकऱ्यांनी मशाल पेटवून जल्लोष साजरा केला

मंठा : (नेत्रान्युज 24)
जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल यांनी आपला जिल्हा संपूर्ण कोरोना लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी ‘मिशन कवच कुंडल’ ही संकल्पना उदयास आणली. त्यांनी या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना १००% लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते.
मंठा तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीने या अभियानाअंतर्गत १५ ते २५ सप्टेंबर पर्यंत आरोग्य विभागाच्या मदतीने जास्तीत जास्त लसीकरण करून घेऊन जिल्ह्यातून १०० % पहिला डोस घेण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.गावामध्ये ग्रामपंचायतीने आरोग्य,शिक्षण व लसीकरण पथकाच्या सहकार्याने एकूण १३ लसीकरण शिबीर घेण्यात आले.आज रोजी मतदार यादीनुसार १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे,असे सरपंच गजानन फुपाटे यांनी सांगितले.
या अभियानाअंतर्गत उपसरपंच अविनाश राठोड यांनी स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी त्वरित लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.आपले गाव १००% लसीकरण झाल्यामुळे ग्रामपंचायतसमोर मशाल पेटवून गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
ग्रामसेवक बाबासाहेब गवळी यांनी नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने दुसरा डोस ३९% झाल्याचे सांगितले.पुढे त्यांनी येत्या डिसेंबर पर्यंत दोन्ही डोस १००% पूर्ण होईल, अशी आशा दर्शवली आहे.
हे लसीकरण घेण्यामध्ये मंठा पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांचे मार्गदर्शन,तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे यांचा सहकार्याने आपण पूर्ण लसीकरण करू शकलो असे उपसरपंच यांनी सांगितले.
हे मिशन पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आरोग्य सहाय्यक एच.एन.इकडे,विनोद खंदारे,मुख्याध्यापक एस.बी.जायभाये व नंदकिशोर साबू ,आरोग्यसेवक घुले व श्रीमती व्ही.के.ताजणे, द्वारका कोकाटे,सुमन सानप,उर्मिला सुतार,एस.बी.घुगे,व्ही.एस.दुभळकर,एस.एम.नागवे, रघुनाथ कोकाटे इत्यादी कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य मिळाले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close