♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मराठवाड्यातून बुलेट ट्रेन धावणार? चव्हाण म्हणतात, पंतप्रधानांना पत्र लिहिले.

औरंगाबाद : (नेत्रा न्युज 24) संकेत मगरआमच्या प्रयत्नांना यश आले तर,औरंगाबाद,पुणे,नांदेड, हैदराबाद असा बुलेट ट्रेन मार्ग होऊ शकतो,अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली औरंगाबाद मधील पत्रकार परिषदेत बोलत होते.औरंगाबाद मराठवाडा विकास सुसाट वेगाने सुरू आहे. आमच्या प्रयत्नाला यश आले तर,औरंगाबाद,पुणे,नांदेड, हैदराबाद असा बुलेट ट्रेन मार्ग होऊ शकतो अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर नांदेडला बुलेट ट्रेन बनवण्यासाठी मुख्यमंत्र्याला बोललो आहे.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही बोललो आहे.तसेच बुलेट ट्रेन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांनाही पत्र लिहिलेले आहे अशी माहिती अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद मध्ये बोलताना दिली आहे.

  • मुंबई,पुणे,नांदेड,हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग प्रतितास ३५० किलोमीटर वेगाने जाऊ शकतो असे अशोक चव्हाण यांनी  सांगितले.
    चव्हाणच्या या वक्तव्यामुळे मराठवाड्याला बुलेट ट्रेनचा अनुभव मिळणार अशी आशा लोकांच्या मनात निर्माण होत आहे.समृद्धी महामार्गाला नांदेड जालना,परभणी, हिंगोली जोडणार. औरंगाबाद मधील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले समृद्धी महामार्गाला अनेक जिल्हे जोडण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया मार्च पर्यंत होईल नांदेड,जालना,परभणी हिंगोली हे चार जिल्हे समृद्धी महामार्गला जाणार आहे.                                                पत्रकार परिषदेत अशोकराव चव्हाण म्हणाले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय तिथे एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्णय झाले आहे. अर्थसंकल्पात तरतूद १२३९ कोटीची कामे मजुरी देण्यात आली आहे.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा,धार्मिक स्थळे सुरू होत आहेत.२२ ऑक्टोंबर पासून नाट्यगृह सुरू असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.पिकविमा वर अनेक राज्य नाराज केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेवर अशोकराव चव्हाण यांनी ताशेरे ओढले. पीक विमा योजनेचा अनुभव फारसा चांगला नाही. पिक विमा पंचनामे लवकर होत नाहीत या कारणामुळे देशातल्या पाच राज्यांनी पीक विमा नको अशी भूमिका घेतली आहे.त्यात गुजरात हे ही राज्य आहे.या योजनेतील त्रुटी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ सुद्धा पंतप्रधानाना भेटले आहे.अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close