♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मंठा तालुक्यातील पाझर तलावाना झाडांचा विळखा लघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष  अधिकारी कर्मचारी असतात कायम गैर हजर 

 

मंठा- (नेत्रा न्युज 24)

तालुक्यातील लघुपाटबंधारे खात्याकडून बनवण्यात आलेल्या पाझर तलावाच्या भिंतींवर वनिकरणासारखी घनदाट वृक्ष वाढलेली पाहायला मिळत असून या तलावांकडे लघुपाटबंधारे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी गैर हजर रहात असल्यामुळे कायम दुर्लक्ष होताना दिसत आहे.तालुक्यात मागिल तीस चाळीस वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे खात्याकडून बरीच पाझर तलाव बांधले गेलेले आहेत त्यात काही तलावांची कामे अधुरी राहीलेली आहेत काही ठिकाणी पाझर तलाव बांधले परंतु या तलावाचे सांडव्याच्या भिंतीची बांधकामे झालेली नसल्यामुळें आणि हे तलाव गाळानी भरून गेल्याने या तलावांमध्ये पाणी साठून राहात नसल्यामुळें या तलावांचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होताना दिसत नाही.

शेतकऱ्याच्या शेकडो एकर जमीन या तलावांमध्ये अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत परंतु अधुऱ्या कामांमुळे हे तलाव शोभेच्या वस्तु असल्याचे निदर्शनास येत आहे.
या ठिकाणी असलेले लघुपाटबंधारे खात्याचे कार्यालय या आगोदर वाटूर फाटा या ठिकाणी होते परंतु या ठिकाणी कार्यालयांत कोणी हजर राहत नसल्यामुळें हे कार्यालय मागिल अनेक वर्षांपासून मंठा शहराच्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून या कार्यालयाकडे कुणाचे लक्ष नसल्यामुळें येथिल अधिकारि कर्मचारी सर्वच औरंगाबाद, जालना शहराच्या ठिकाणी रहात असल्यामूळे कार्यालयात कोणी हजर राहत नाहीत.कार्यालयीन कामकाजात कुणाचे लक्ष नसल्यामुळें तालुक्यातील पाझर तलावाची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या तलावांच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढलेली असल्यामूळे अतिवृष्टी झाल्यास हे तलाव फुटुन शेतकऱ्यांच्या शेतीसह पीकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

या ठिकाणी कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी डी एन श्रीवास्तव हे औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्यास असुन ते कधीच कार्यालयात हजर राहत नसल्यामुळें त्यांचा सर्व कारभार कार्यकारी अभियंता वाघमारे पाहात असल्याचे त्यांच्याकडून संगण्यात येते. या ठिकाणी एकुण अधिकारी कर्मचारी एक शिपाई असे सात जण आहेत परंतु शिपाई सानप वगळता या कार्यालयात कोणीच हजर रहात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.
तालुक्यातील मध्यम प्रकल्प, पाझर तलाव यांची अपुरी राहीलेली कामे पुर्ण करुन तलावातील गाळ व तलावाच्या भिंतीवर वाढलेली झाडे काढून भिंती सुरक्षित कराव्यात अशी मागणी काग्रेसचे तालुका अध्यक्ष नीळकंठ वायाळ यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close