♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी- डाॅ.धोंडोपंत मानवतकरमंठा : (नेत्रा न्युज 24)
येथील आविष्कार साहित्य मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
रविवार दि.५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत मंडळाचे संस्थापक, साहित्यिक डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करून याच दिवशी आविष्कार मंडळाच्या अध्यक्षपदासाठी डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. सदाशिव कमळकर यांच्याकडून आविष्कार साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे रितसर डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांच्याकडे देण्यात येऊन उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष- डाॅ.संतोष मोरे, सचिव- के.पी.इंगळे, सहसचिव- शिवाजी जाधव, कोषाध्यक्ष- ओमप्रकाश राठोड, सदस्य- प्रा.डाॅ.सदाशिव कमळकर,प्रा.प्रदीप देशमुख, बाबुजी तिवारी, विवेक सोनटक्के, पी.टी.प्रधान, अनिल पांडे, सौ.शोभा डहाळे, बालासाहेब वाघमारे, प्रा.परमेश्वर शेळके, शत्रुघ्न तळेकर.
मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळ १९९२ म्हणजे गेल्या तीन दशकापासून हे मंडळ अविरतपणे साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आले आहे. १९९४ पासून एकदिवसीय साहित्य संमेलन,परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन यासारखे कार्यक्रम घेत आहे. अशा कार्यक्रमातून अनेक कवी, लेखक, कलावंत निर्माण झाले आहेत. अनेक दिग्गज, नामवंत कवी, लेखकांनी या कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे. यामुळे मंठ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी कवितेचा साहित्याचा रसिकवर्ग तयार झाला आहे.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये “पौर्णिमा कवितेची”या शीर्षकाखाली कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून येथील रसिकांचाही आग्रह असतो.
यापूर्वी प्राचार्य के.पी.इंगळे व प्रा.डाॅ. सदाशिव कमळकर यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे.”आम्ही साहित्याचे देणे लागतो” या भूमिकेत मंडळाच्या सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो यापुढेही साहित्यविषयक कार्यक्रमाच्या आयोजनातून जुन्या नव्या रसिकांमध्ये अभिरुची निर्माण करण्यासाठी मंडळ कार्यरत राहणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष डाॅ. धोंडोपंत मानवतकर यांनी सदर बैठकीत बोलून दाखवले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close