♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

 

मंठा – (नेत्रा न्युज 24) तालुक्यातील शैक्षणिक कारभार येथील गटसाधन केंद्रातून चालतो .परंतु या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयीन कर्मचारी नियुक्त नसल्याने तालुक्यातील काही शिक्षकांची याठिकाणी वर्णी लागली असुन या शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करून कार्यालयात थांबनेच पसंद केल्याने या ठिकाणी कार्यालयीन सर्व कामे अनेक वर्षांपासून खोळंबलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी कार्यालयीन कर्मचारी अनेक वर्षांपासून महत्वाकांशी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी निर्माण केलेले गट शिक्षणाधिकारी पद शासनाने अद्याप भरलेले नसल्याने या पदाचाअतिरिक्त पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी सतीश शिंदे यांच्याकडे दिलेला आहे तर खोराड सावंगी येथील शिक्षक के जी राठोड हे प्रति नियुक्तीवर गट समन्वयक पदावर कार्यरत असुन त्यांच्यावर शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे तसेच लिबोना येथील सहशिक्षक सदाशिव तोटे यांची नियुक्ती आठ वर्षांपासून गटसाधन केंद्रात लिपिक म्हणून करण्यात आली आहे.
तर शिष्यवृत्ती विभाग मोबाईल टीचर रामदास माने यांच्याकडे देण्यात आला आहे व आवक जावक विभाग कंत्राटी मोबाईल टीचर खांडेकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे शिवाय प्रशिक्षण व पाट्या पुस्तक विभाग जगन्नाथ गुटे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशाला येथील बी के बोराडे यांच्यावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सहाय्यक पदाचा पद भार असुन या विभागाची मोबाईल टीचर व साधन व्यक्ती यांच्यावर कार्यालयातील कारकुनी पदाची जबाबदारी मोबाईल टीचर व साधन व्यक्ती यांच्यावर सोपवण्यात आली असुन पाचशेहून अधिक शिक्षक कार्यरत असलेल्या व दीडशेहून अधिक शाळा असलेल्या मंठा तालुक्याचे शैक्षणिक भवितव्य आशा प्रकारे अतिरिक्त पद भार व प्रतिनियुक्तीवर चालु असुन ही मोठीं खेद जनक बाब आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी देखील तालुक्यातील काही होतकरू शिक्षक ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे संबंधितांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून आशा कारकुनी शिक्षकाना तात्काळ आपापल्या शाळेवर पाठवुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे

[responsive-slider id=1811]

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close